कांद्याचे भाव घसरल्याने संतप्त शेतकरी रस्त्यावर
कांद्याचे भाव मोठ्याप्रमाणात घसरल्यानं आज संतप्त शेतकऱ्यांनी शिर्डी-मालेगाव रस्त्यावर आंदोलन केले. आधीच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे.
नाशिक : कांद्याचे भाव मोठ्याप्रमाणात घसरल्यानं आज संतप्त शेतकऱ्यांनी शिर्डी-मालेगाव रस्त्यावर आंदोलन केले. आधीच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे.
लाल कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहे. त्यामुळे आज मनमाड बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू होताच कांद्याच्या भावात 300 ते 400 रूपयांची घसरण झाली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला.
सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत शिर्डी -मालेगाव राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. कांद्याच्या भावात होत असलेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही. म्हणून कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली.