पिंपरी चिंचवड : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भारतरत्न मिळाला पाहिजे असं मत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केलंय. ते पिंपरीत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं गायिका सुनिधी चौहान हिला आशा भोसले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी मोहन जोशी यांनी ही भूमिका मांडली. 


तर आशा भोसले यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार खूप मोठा असल्याची भावना सुनिधीने व्यक्त केली. या वेळी तीन एक गीत ही सादर केले.