अशोक चव्हाणांना गड राखण्यात यश...
नांदेडच्या जिल्हा परिषदेत सत्ता राखण्यात अशोक चव्हाणांना यश आलंय.
नांदेड : नांदेडच्या जिल्हा परिषदेत सत्ता राखण्यात अशोक चव्हाणांना यश आलंय.
जिल्हा परिषदेत काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीची सत्ता स्थापन झाली... अध्यक्षपदावर काँग्रेसच्या शांताबाई पवार जवळगावकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समाधान जाधव विजयी झाले. या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 40 मतं मिळाली.
भाजपा आणि शिवसेनेनंही अध्यक्ष - उपाध्यक्ष पदासाठी आपले उमेदवार दिले. भाजपाला 13 तर सेनेला 10 मते मिळाली...
विशेष म्हणजे नांदेडमध्ये कोंग्रेसला सत्तेपासुन रोखण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी केली होती. सेना - भाजप आणि राष्ट्रवादी अशी आघाडी करण्याचे प्रयत्नही झाले. भाजपाने राष्ट्रवादीला अध्यक्षपदाची ऑफरदेखील दिली होती... पण अशोक चव्हाणांनी राष्ट्रवादीसोबत जुळवून घेऊन विरोधकांचे मनसुबे उधळून लावले.