चव्हाणांची सेना-भाजपच्या `फिक्सिंग`वर टीका
शिवसेना आणि भाजपा एकमेकांना बदमाश म्हणत असून हे दोघेही नंतर एकत्र येऊन वाटून खाण्याचं काम करतील, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सेना भाजपावर हल्लाबोल केलाय.
नांदेड : शिवसेना आणि भाजपा एकमेकांना बदमाश म्हणत असून हे दोघेही नंतर एकत्र येऊन वाटून खाण्याचं काम करतील, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सेना भाजपावर हल्लाबोल केलाय.
नांदेड जिल्ह्यातील कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ अशोक चव्हाणांनी फोडला. यावेळी बोलताना चव्हाणांनी ही टीका केलीय.
सेना - भाजपा दोघे डब्ल्यू डब्ल्यू एफ प्रमाणे सध्या भांडत आहेत पण दोघांमध्ये आगोदरच मॅच फिक्सिंग झाल्याची टीका चव्हाणांनी केली.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने नांदेड जिल्ह्यात चांगले यश मिळवले होते... आता जिल्हा परिषदेत वर्चस्व राखण्याचं आव्हान अशोक चव्हाणांपुढे आहे.