पुणे: भय्य़ूजी महाराज यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. रांजणगाव गणपतीजवळ भय्यूजी महाराज यांच्या गाडीला अपघात घडवून ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासंदर्भात रांजणगाव पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस कसून तपास करत आहेत. भय़्यूजींच्या गाडीला अपघात घडवणा-या ट्रक आणि ट्रक चालकाला ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आलंय. 


चौकशी केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. भैय्यू महाराज यांच्यावर पुणे इंदुर प्रवासादरम्यान रांजणगाव आणि मनमाडला दोन वेळा हल्ला झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.