भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड
औरंगाबादमध्ये भाजप आमदार अतुल सावे यांच्या बजरंग चौक इथल्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप अतुल सावे यांनी केलाय.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये भाजप आमदार अतुल सावे यांच्या बजरंग चौक इथल्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप अतुल सावे यांनी केलाय.
बहुजन क्रांती मूक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घुसून, पंडित दिनदयाळ उपाध्याय पुण्यतिथी कार्यक्रमात गोंधळ घातला होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी सावेंनी केली होती. त्यावरुन ही तोडफोड करण्यात आल्याचं सावे म्हणाले.