नाशिक : गेल्या काही दिवसांपासून पोलीसांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढत चाललेय. नाशिकमध्ये पुन्हा एकदा पोलिसावर हल्ला केल्याची घटना घडलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील हवालदार विजय मोरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केलाय. 


गुरुवारी रात्री 8 च्या सुमाराला मोरे पिंपळ चौक परिसरात गस्त घालत होते. यावेळी दोन टोळक्यांमध्ये भांडण सुरू असलेलं त्यांना दिसलं. ते सोडवण्यासाठी मोरेंनी मध्यस्थी केली. 


यावेळी जमावातल्या काही अज्ञातांनी लाकडी दंडुक्यानं पाठीमागून त्यांच्या डोक्यावर हल्ला केला. यात मोरे गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.