ट्रीपलसीट जाणाऱ्या बाईकस्वारांनी पोलिसाच्या अंगावर घातली दुचाकी
पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना अजूनही सुरूच आहेत. कल्याण आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झाला आहे. नाकाबंदी दरम्यान ट्रीपलसीट जाणा-या बाईकस्वारांनी पोलिसाच्या अंगावर दुचाकी घातल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.
पिंपरी-चिंचवड : पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना अजूनही सुरूच आहेत. कल्याण आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झाला आहे. नाकाबंदी दरम्यान ट्रीपलसीट जाणा-या बाईकस्वारांनी पोलिसाच्या अंगावर दुचाकी घातल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.
नाकाबंदी दरम्यान ट्रीपलसीट जाणा-या बाईकस्वारांनी पोलिसाच्या अंगावर दुचाकी घातल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीय. सुरेश चपटे असं या पोलिसाचं नाव असून या घटनेत ते गंभीर जखमी झालेत.. रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास मोशी टोलनाका इथं पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली होती. त्यावेळी ट्रीपल सीट पुण्याकडे जाणा-यांना चपटे यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र यावेळी थांबण्याऐवजी या आरोपींनी चपटे यांच्या अंगावर बाईक घातली.. या घटनेत चपटे यांच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झालीय. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या घटनेनंतर आरोपी बाईक घटनास्थळावर टाकून पसार झाले.