डोंबिवली : आरटीआय कार्यकर्ते आणि निर्भय बनो संघटनेचे अध्यक्ष महेश निंबाळकर यांच्यावर बुधवारी भरदिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेश निंबाळकर हे डोंबिवलीतील नामांकित सामाजिक कार्यकर्ते आहेत. बुधवारी दुपारी अडीच वाजता डोंबिवली पूर्वेकडील कस्तुरी प्लाझा समोरील नीता ट्रॅव्हल समोर पाच - सहा अज्ञात लोकांनी निंबाळकर यांना घेरलं... आणि त्यांना दांडक्यानं मारहाण केली. 


निंबाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला

ही मारहाण इतकी जबर होती की निंबाळकर यांच्या डोक्यातून रक्तस्राव व्हायला सुरूवात झाली. त्यांचा एक हात आणि पाय फ्रॅक्चर झालाय. त्यांना आयकॉन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.