कल्याण : पोलिसांवरील हल्ले सुरुच आहेत. कल्याणमध्ये पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला. तिसगाव नाका परिसरात ही धक्कादायक घटना घडलीय. गणपती विसर्जनावेळी पोलीस निरीक्षक यांना तलावात बुडवून मारण्याचा प्रकार घडला.  गुन्हा दाखल करु नये, यासाठी स्थानिक आमदारांने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणमधील पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना बुडवून मारण्याचा प्रकरण दडपण्याचा प्रकार सुरु असल्याचे समोर आले. स्थानिक आमदार गणपत गायकवाड, डीसीपी संजय शिंदे आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात बंद दाराआड सुमारे चार तास चर्चा केली. त्याआधी गाडीत चर्चा झाली. त्यानंतर पोलीस स्टेशनकडे जाताना आमदार गणपत गायकवाड यांची गाडी पुढे आणि पाठीमागे डीसीपींची गाडी गेली. जवळपास अर्धा तासानंतर डीसीपी परतले. 


मात्र रात्री घडलेल्या घटनेला 7 ते 8 तास उलटल्यानंतरही पहाटे 4 पर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला नाही. त्यामुळं पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यांनी एकप्रकारे बंडाचा झेंडा हाती घेतल्याचं चित्र पाहायला मिळाले. या सगळ्या प्रकाराबद्दल डीसीपींना विचारले असता त्यांनी लांबूनच नमस्कार करुन काढता पाय घेतला.