कल्याण : गणपती विसर्जनावेळी पोलीस निरीक्षक यांना तलावात बुडवून मारण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करु नये, यासाठी स्थानिक आमदारांने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणमधील पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना बुडवून मारण्याचा प्रकरण दडपण्याचा प्रकार सुरु असल्याचे समोर येत होता. स्थानिक आमदार गणपत गायकवाड, डीसीपी संजय शिंदे आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात बंद दाराआड सुमारे चार तास चर्चा केली. 


दरम्यान, आज जरीमरी मित्र मंडळाच्या ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हे आपले कार्यकर्ते नाहीत, असा पवित्रा आमदार गणपत गायकवाड यांनी घेतला आहे.