अश्विनी पवार, पुणे : दिवाळी पहाट, दिवाळी फराळ आणि सोबत दिवाळी अंक... महाराष्ट्राची ही सांस्कृतिक ओळख. आता मात्र दिवाळी अंकही कात टाकतोय. 'बुकगंगा'तर्फे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातला दिवाळी अंक यावर्षी वाचकांच्या भेटीला येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीच्या फराळा इतकंच महत्त्व हे मराठी घराघरात दिवाळी अंकांना आहे. आता हेच दिवाळी अंक तुम्हाला घरबसल्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून ऐकता येणार आहेत. 'बुकगंगा'ने यासंबंधीचं ऑडिओ बुक अॅप विकसीत केलंय, अशी माहिती संचालिका गौरी बापट आणि संस्थापक मंदार जोगळेकर यांनी दिलीय.  


यावर्षीच्या ऑडीओ दिवाळी अंकात आशुतोष जावडेकर, स्पृहा जोशी, अशोक नायगावकर, वंदना गुप्ते यांसारख्या अनेक मान्यवरांच्या कथा लेख ऐकायला मिळणार आहेत. 


बदलत्या जीवनशैलीमुळे वाचनाकडे रसिकांची काहीशी पाठ फिरलेली पाहायला मिळते. मात्र आता अशी ऑडिओ बुक ऍप पुन्हा एकदा तुम्हाला साहित्य विश्वात फेरफटका मारायला मदत करतील.