मुलाच्या आरोपीला शासन व्हावे म्हणून महिलेचे उपोषण
एकुलता एक मुलगा अपघातात गेला आता त्याला वर्ष उलटलं तरीसुद्दा पोलीस अजूनही आरोपींना पकडू शकली नाही म्हणून न्याय मिळवण्यासाठी 55 वर्षीय माऊली औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसली आहे.
औरंगाबाद : एकुलता एक मुलगा अपघातात गेला आता त्याला वर्ष उलटलं तरीसुद्दा पोलीस अजूनही आरोपींना पकडू शकली नाही म्हणून न्याय मिळवण्यासाठी 55 वर्षीय माऊली औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसली आहे.
पोलीस ठाण्यात चकरा मारून वैतागले मात्र पोलीस न्याय देत नाही. पैसा, अडका नको मात्र किमान आरोपींना शासन व्हावे इतकीच इच्छा असल्याचं त्या म्हणाल्या.
मीनाबाईचा अपघातात वारलेला संतोष हा एकुलता एक मुलगा, आणि कमावणाराही घरचा कर्ता धर्ता तोच होता.