औरंगाबाद : औरंगबादचे महापौर आणि सभापतींनी उत्साहाच्या भरात बछड्यांना हातात घेऊन फोटोसेशन केलंय. औरंगाबादचं सिद्धार्थ उद्यान पिल्लं दगावण्याच्या घटनेमुळे कायम चर्चेत असतं. याच उद्यानातल्या पिवळ्या वाघीणीनं चार बछड्यांना जन्म दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बछड्यांचा नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. गुरूवारी हा सोहळा पार पडला. यावेळी महापौर भगवान घडामोडे, सभापती मोहन मेघवाले उपस्थित होते. या दोघांनीही यावेळी उत्साहाच्या भरात ही नियमबाह्य वर्तणूक केलीय. त्यांनी नामकरण केलेल्या या दोन महिन्याच्या बछड्याला थेट हातात घेऊन फोटोसेशन केलं. 


यावेळी इथे उद्यानाचे सर्व अधिकारी उपस्थित असुनही कुणीही काहीही बोललं नाही. फोटोसेशन करण्यापेक्षा उद्यानातल्या पिल्लांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं असतं तर आणखी चांगलं झालं असतं अशीच चर्चा आता औरंगाबादमध्ये सुरूय.  पण आता यावर काही कारवाई केली जातेय का याकडे वन्यप्रेमींच्या नजरा लागल्यात.