औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण होणार, अशी चिन्हे निर्माण झालीय. पंचायत समितीमध्ये शिवसेना काँग्रेस एकत्र आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठीही अशीच युती होणार हे निश्चित आहे. मात्र, आता भाजपनंही चांगलीच मोर्चेबांधणी सुरु केलीय. याबाबत भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांसोबत संपर्क करण्याचाही प्रयत्न सुरु केलाय. 


मात्र, शिवसेना दाद देत नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे. भाजपचे 23 जागा निवडणून आल्यात तर राष्ट्रवादीचे तीनजण भाजपला पाठिंबा देणार आहेत. मनसेचा एक आणि एक अपक्षही भाजपसोबत असल्याचा दावा भाजप नेते करत आहेत.


तरीही भाजपला अजून 4 जागांची गरज आहे. त्यात आता कोण गळाला लागणार याची उत्सुकता आहे. तर शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यास सहज सत्ता स्थापण करणे शक्य आहे.