आयुर्वेदिक डॉक्टरांनी शोधला अफलातून उपाय
आयुर्वेदिक डॉक्टरांनी शोझधला अफलातून उपाय
पिंपरी-चिंचवड : वाढतं शहरीकरण, बदललेली जीवनशैली यामुळं अनेक आजारांना आयत आमंत्रण मिळतं. त्यावर मात करण्यासाठी गड्या आपलं गावं बरा अशी भावना बळावते. पण आधुनिकतेच्या रेट्यात ते शक्य होत नाही. पिंपरी चिंचवडमधल्या एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी त्यावर अफलातून उपाय शोधला आहे.
आयुर्वेदिक डॉक्टर संतोष सूर्यवंशी यांच हिरवेगार शेत आहे. काही वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड मधल्या सांगवी इथे संतोष सूर्यवंशी यांनी आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरु केलं. अनेकांना आजार होतात ते शहरीकरणाच्या रेट्यात बदललेल्या जीवनशैलीमुळे हे त्यांच्या लक्षात आलं.
पौष्टिक आहाराचा अभाव हे यातलं मुख्य कारण. यावर उपाय म्हणून त्यांनी शहराच्या जवळच एक शेत घेतलं. आणि तिथं फुलवली ही आयुर्वेदिक नैसर्गिक शेती. ज्वारी, गहू, तांदूळ यांच्या देशी जाती इथे आहेतच. त्याच बरोबर केळीच्या तब्ब्ल २२ जाती, देशी ऊसाचे १९ प्रकारही इथे पाहायला मिळतात. भेंडीचा रस आणि मोहरीच्या तेलापासून बनवलेला गूळ इथलं खास वैशिष्ट्य. विविध औषधी वनस्पती इथे सर्रास पाहायला मिळतात. त्यांच्या या प्रयत्नांना त्यांच्या कुटुंबियांची मोलाची साथ लाभली.
या आयुर्वेदिक औषधांमुळे उपचार केंद्रात आलेल्या अनेकांचे अशक्य वाटणारे आजार अगदी १५ दिवसात बरे झाल्याचा दावा, डॉक्टर संतोष सुर्यवंशी यांनी केलाय. उत्तम प्रकृती हेच खरं धन, हा मोलाचा उपदेश प्रत्यक्षात उतरवणारं असंच डॉक्टर संतोष सुर्यवंशी यांचं हे आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे.
पाहा व्हिडिओ