मुंबई: रिक्षा परवाना नुतनीकरणाचं शुल्क 100 रुपयांवरुन एक हजार रुपये केल्याच्या निषेधार्थ 4 मार्चला रिक्षा चालक राज्यव्यापी संप पुकारणार आहेत. रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष शशांक राव यांनी ही माहिती दिली आहे. 


मुंबईमध्ये रिक्षा चालक मालक संघटना कृती समितीची बैठक झाली, या बैठकीत संपावर जायचा निर्णय घेण्यात आला. नवीन मोटार वाहन कायदा क्लिष्ट आहे, त्याविरोधात सगळ्या संघटनांनी एकत्र यावं, आणि रिक्षा चालकांच्या पाठीशी उभं रहावं असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं.