नांदेड : शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबण्याचं नाव घेईनात... याच विषयी बोलताना मात्र शेतकरी नेते आणि अचलपूरचे अपक्ष आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांची जीभ घसरलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तणावग्रस्त शेतकरी दारू पितात... आणि दारु पिण्याच्या सवयीच्या आहारी गेल्यानं ते आत्महत्या करतात, हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न बच्चू कडू करत होते. परंतु, आपलं म्हणणं मांडताना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. 


अभिनेत्री आणि भाजप नेत्या हेमामालिनी यांचं उदाहरण त्यांनी दिलं... 'हेमामालिनी रोज दारू पितात, म्हणून त्यांनी काय आत्महत्या केली का?' असा सवाल त्यांनी विचारला. ते नांदेडमध्ये बोलत होते. 


इतकंच नाही तर दारू पिऊन शेतकरी आत्महत्या करतात हे नारायण राणेंचं वक्तव्य अधोरेखित करत बच्चू कडू यांनी 'कोण दारू पित नाहीत... जवळजवळ 75 टक्के आमदार - खासदारच काय तर पत्रकारही दारू पितात... हेमामालिनी तर रोज बंपर दारु पिते, तिने तर अजून आत्महत्या केलेली नाही' असं वक्तव्य त्यांनी केलंय. 


नितीन गडकरींच्या पोरीच्या लग्नाचा चार कोटींचा खर्च झाला, मग आम्ही काय वाट पाहणार का त्यांच्या आत्महत्येची... असं म्हणत लग्नाचा खर्च जास्त होतो म्हणून शेतकरी आत्महत्या करतात, असा नितीन गडकरींचा दावाही त्यांनी खोडून काढला.