पिपरी चिंचवड : चाकण मधल्या बजाज कंपनीच्या विश्वकल्याण कामगार संघटनेच्या वतीनं दोन दिवसाचे उपोषण सुरु केलंय. कामगारांच्या विविध मागण्या कंपनी प्रशासनानं मान्य कराव्यात अन्यथा मोठं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा कामगारांनी यावेळी दिलाय.


 वेतन करारावर बोलणी फिसकटल्याने 2013 मध्ये कामगारांनी कंपनी विरोधात मोठे आंदोलन उभारले होते. त्यात सहभाग घेतलेल्या जवळपास आठ कामगारांना कंपनीने कामावरून काढून टाकलंय, त्यांना परत कामावर घ्या, ही प्रमुख मागणी संघटनेनं केलीय.   लाक्षणिक उपोषणात मोठ्या प्रमाणात कामगार सहभागी होते.