कल्याण : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा कल्याणच्या काळा तलाव परिसरात झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हा सोहळा झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सव्वा एकर जागेत हे स्मारक आकारण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या स्मारकाचं उद्घाटन केले. आजच्या कार्यक्रमासाठी कल्याणमध्ये शिवसेनेने जय्यत तयारी केली होती. शहरभर बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पोस्टर्स लावण्यात आली आहेत.


कल्याण आणि बाळासाहेबांचं खूप जुनं नातं आहे. नवरात्राच्या दिवसात बाळासाहेब दुर्गाडीच्या किल्ल्यावर दर्शनासाठी आवर्जुन येत असत. त्यामुळे बाळासाहेबांचे स्मारक कल्याणमध्ये उभारलं जात असल्यानं त्याविषयी लोकांमध्येही मोठी उत्सुकता आहे.