बांबू प्रशिक्षणासाठी टाटा ट्रस्ट-सरकारमध्ये सामंजस्य करार
राज्यातील वनव्याप्त क्षेत्रातील आदिवासी आणि नागरिकांसाठी ५ जानेवारी रोजी एक महत्वाचा बदल होऊ घेतला आहे. टाटा ट्रस्ट आणि राज्य सरकार वनविभाग यांच्यात बांबू प्रशिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात सामंजस्य करार होणार आहे.
चंद्रपूर : राज्यातील वनव्याप्त क्षेत्रातील आदिवासी आणि नागरिकांसाठी ५ जानेवारी रोजी एक महत्वाचा बदल होऊ घेतला आहे. टाटा ट्रस्ट आणि राज्य सरकार वनविभाग यांच्यात बांबू प्रशिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात सामंजस्य करार होणार आहे.
या रतन टाटा या सोहळ्याला उपस्थित राहणार असून त्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरु झाली आहे. चंद्रपूर शहरालगतच्या चिचपल्ली येथे देशातील अद्ययावत संस्था उभारली जाणार असून याचा लाभ वनव्याप्त क्षेत्रातील सर्व समूहांच्या सर्वंकष विकासात होणार आहे.
टाटांसोबतच्या सामंजस्य करारामुळे संशोधन -प्रशिक्षण आणि त्याचे बाजार मूल्य वर्धन यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत होणार असल्याने प्रकल्प राज्याच्या दृष्टीने पथदर्शक ठरणार आहे.