पुणे : बाणेर अपघातातील आणखी एकाचा मृत्यू झाला. पूजा विश्वकर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भरधाव कारने ५ जणांना चिरडले होते. उपचारादरम्यान चिमुकल्याच्या आईचाही मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्ता ओलांडण्यासाठी डीव्हायडर जवळ उभ्या असलेल्या चार जणांच्या कुटुंबाला एका भरधाव आलेल्या कारने उडवले होते. रस्ता ओलांडण्यासाठी हे चौघे डीव्हायडरवर उभे होते. मात्र भरधाव वेगात आलेली एक कार चक्क डिव्हायडरवर चढली आणि या चौघांना गाडीने उडवले. 


या अपघातातील जखमींपैकी तीन जण गंभीर जखमी होते. त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींवर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. यावेळी पूजा विश्वकर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 



दरम्यान, पुणे बाणेर रोडवरील अपघातातील आरोपी सुजाता जयप्रकाश श्रॉफ यांना अटक करण्यात आलाय. श्रॉफ यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे. त्याबरोबर मोटार वाहन कायद्यानूसार देखील श्रॉफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.  दरम्यान सुजाता श्रॉफ यांच्या गाडीखाली आलेल्या पूजा विश्वकर्मा यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पूजा यांची तीन वर्षाची मुलगी ईशाचा काल मृत्यू झाला होता.


कार चालक सुजाता श्रॉफ हिला पुना हॉस्पीटलमधून पोलिसांनी अटक केली आहे.