बँक कर्मचाऱ्यांनी केला ६ कोटीचा गैरव्यवहार
ठाण्यातील लोकपूरम शाखेतील आणखी एका गैरव्यवहार समोर आला आहे.
ठाणे : ठाण्यातील लोकपूरम शाखेतील आणखी एका गैरव्यवहार समोर आला आहे.
बँकेच्या लोकपूरम शाखेतील कर्मचारी अंजली पिसाळ, चंद्रशेखर कर्वे, उन्नती ठोंबरे, सतीश जांभळे, विकास कुबल, नरेंद्र जाधव आणि खातेदार सत्येन सालवा या मंडळींनी मिळून बँकेत बोगस खाते उघडले.
या बोगस खात्याअंतर्गत क्रेडिट कार्ड मिळवून मंजूर रक्कमेच्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढली. तसेच संगणकामध्ये फेरफार करून इतरही खातेदारांच्या खात्यातून रक्कम काढून त्यांचा अपहार केला.
हा सर्व घोटाळा ६ कोटी ९२ लाख १९ हजार ४७ रुपये इतक्या रक्कमेचा असून २०११ ते २०१४ या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी राजेंद्र फणसे (५४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.