बीड : बँकेतील  बेकायदा कर्ज वाटप प्रकरणी तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्यासहीत १६ जणांना तुरूंगवास आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील बेकायदा कर्ज वाटप प्रकरणी दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांपैकी पहिल्या प्रकरणाचा निकाल आज लागला. या गुन्ह्यात डिसीसीचे तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्यासहीत १६ जणांना ५ वर्षे तुरूंगवास आणि ६० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.


घाटनांदूरच्या शेतकरी सहकारी तेलबिया प्रक्रिया संस्थेला देण्यात आलेल्या कर्ज प्रकरणी ही शिक्षा ठोठवण्यात आली आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २००९ मध्ये तब्बल २ कोटी ७५ लाखांचं कर्ज दिलं होते.


हे कर्ज बेकायदा दिल्याचा ठपका ठेवत लेखा परिक्षणातील अहवालानूसार जिल्हा बँकेच्या तत्कालीन अध्यक्षासह आठ संचालक आणि बँकेच्या बड्या अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.