पेनाच्या आकाराचा हुक्का, पालकांनो सावधान
शाळकरी मुलांमध्ये वाढती व्यसनाधीनता हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. आता आणखी एका नव्या व्यसनाने पुण्यातील लहान मुले आणि तरुणाई ग्रासल्याच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणले आहे. हे व्यसन आहे हुक्का आणि तेही रोजच्या वापरातल्या पेन मधून.
पुणे : शाळकरी मुलांमध्ये वाढती व्यसनाधीनता हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. आता आणखी एका नव्या व्यसनाने पुण्यातील लहान मुले आणि तरुणाई ग्रासल्याच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणले आहे. हे व्यसन आहे हुक्का आणि तेही रोजच्या वापरातल्या पेन मधून.
कसे आहे हे पेन
मुलं शाळेत जातात तेव्हा त्यांच्याकडे पेन असते. मात्र हेच पेन अभ्यासाकरिता नाही तर हुक्का ओढण्यासाठी वापरले जाते. हे हुक्क्याचे यंत्र हुबेहूब पेनासारख दिसत असल्याने त्याच्यावर कुणाच लक्ष्य हि जात नाही. त्यामुळे आपली मुलं जर असे काही पेन वापरत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
नेहमीच्या वेळापत्रकात व्यस्त असणारे पालक पेन पेन्सिल या बाबींकडे दुर्लक्ष करतात. मात्र शाळेत लिहिण्यासाठी जे पेन वापरले जाते तसेच एक पेन सध्या अनेक उच्चभ्रू आणि झोपडपट्टीतल्या शाळांमध्ये बघायला मिळतेय पण याचा उपयोग लिहिण्यासाठी नाही तर हुक्का ओढण्यासाठी केला जातोय. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थेच्या नजरेस हि बाब उघड झाली आहे.
कुठे मिळते असे पेन
हुक्का ओढण्यासाठी आणि चार्जिंग करता येणार हे इलेक्ट्रोनिक पेन ज्यामध्ये हुक्क्याचा फ्लेवरही भरला जातो, ते आरोग्यासाठी हानिकारक असून शाळकरी मुलांनी त्याच्या आहारी जाणे ही चिंताजनक बाब आहे. अल्पवयीन मुलांचे आयुष्य धुरात बुडवणाऱ्या या पेनमुळे पुण्यातील अनेक शाळांमधली मुले व्यसनाच्या आहारी गेली आहेत. इंटरनेटवर ऑनलाइन विक्री करण्यात येणारे हे पेन अवघ्या हजार ते बाराशे रुपयांना मिळते. त्यामुळे शाळकरी मुलांकडे सर्रास हे पेन आढळून आल्याचे काही समाजिक कार्यकर्त्यांनी म्हंटले आहे. पुण्यातल्या अनेक शाळांमधून हे प्रकार उघड झाल्यानंतर हा प्रकार पालकांसमोर आलाय.
व्यसनाच्या या नव्या पद्धतीने पोलीस आणि माहिती मिळालेले पालकही चक्रावून गेलेत. शाळकरी मुलांमध्ये हे व्यसन फॅशन म्हणून लोकप्रिय होत आहे. त्यामुळे शाळकरी मुलांचा मोठा वर्ग या व्यसनाकडे ओढला जातोय.