भंडारा : जिल्ह्यातल्या तुमसर नगर परिषदेत सद्यस्थितीत राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र यावेळी भाजप बाजी मारणार का? याची उत्सुकता आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहर संपूर्ण जिल्ह्यातली कुबेर नगरी नावानं प्रसिद्ध आहे. तसंच विदर्भातली सर्वात मोठी तांदळाची बाजारपेठही याठिकाणी आहे. तुमसर नगर परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससह सत्तेत आहे. मात्र यावेळी तुमसरमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर आपली ताकद आजमावणारेय. 



तुमसर शहराचा विकास झाल्याचा दावा राष्ट्रवादी पक्ष करत असला तरी काँग्रेसनं मात्र विकासकामांवर बोट ठेवलंय... तर लोकसभा, विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपनं यश मिळवल्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेससमोर सत्ता टिकवण्याचं आव्हान असेल तर भाजपसमोर वर्चस्व निर्माण करण्याचे.