औरंगाबाद : राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना भारीप बहुजन महासंघच्या कार्यकर्त्यांनी औऱंगाबादच्या सुभेदारी गेस्ट हाऊससमोर मारहाण केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गायकवाड शासकीय दौ-यावर औरंगाबादला आले होते. त्यावेळी सुभेदारी विश्रामगृहावर भारिपचे 7 ते 8 कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून गेले आणि गायकवाडांना मारहाण केली. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने गायकवाडांची सुटका केली आणि त्यांना विमानतळावर पाठवण्यात आले.


मुंबईचे आंबेडकर भवन पाडण्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचा संशय आहे. भारिपचे कार्यकर्ते यावेळी रत्नाकर गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणाही देत होते. हा हल्ला करणा-यांमध्ये भारिप बहुजन महासंघाचा जिल्हाध्यक्ष अमित भुईगळसह 6 कार्यकर्ते होते. अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष भारिप, दिनेश साळवे, श्रीरंग ससाने, गौतम गवळी, शांताबाई धुळे, रेखाबाई उजगरे अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.