मुंबई : सध्या जमीनावर बाहेर आलेले मीरा  भाईंदरचे आमदार गिर्ल्बट मेंडोंसा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. मेंडोसांना शिवसेनेत घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुरुंगातून बाहेर येताच आमदार  प्रताप सरनाईक आणि राजन विचारे  यांनी मेंडोंसा  यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे मिरा भाईंदरचे काँग्रेसचे नेते मुज्जफर हुसेन यांनी त्यांची भेट घेतेली. मेंडोसांनी पक्ष सोडू नये यासाठी या भेटीत मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. मेंडोसांनी मात्र याविषयी मौन बाळगलंय. 


गिलबर्ट मेंडोसा यांची तब्बल दहा महिन्यानंतर जामीनावर सुटका झाली आहे. ठाणे येथील बोरीवडे गावातील बेचाळीस हेक्टर जमीनीच्या सात-बाराच्या गैरव्यवहार केल्याचा मेंडोसांवर आरोप आहे. त्यांच्यासह अन्य पाच जणांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. न्यू स्वामी समर्थ कंपनीने हा गुन्हा दाखल केला होता. 


जमीन प्रकरणात मेंडोसा तुरुंगात गेल्यानंतर मिरा-भाईंदर मध्ये राजकीय समीकरण पुर्णपणे बदलले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या जवळपास नगरसेवकांनी शिवसेना आणी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. जेल मधुन जामिनावर सुटुन आल्याच्या नंतर मेंडोसा शिवसेनेत जाणार, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.