नाशिक महापालिकेत ७९ वर्षांच्या नगरसेविका

राजकारणातील महत्वाकांक्षेला वय नसतं असं म्हणतात.. असंच काहीसं दिसतंय नाशिकच्या महापालिकेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून ७९ वर्षांच्या आजीबाई निवडून आल्यात.
नाशिक : राजकारणातील महत्वाकांक्षेला वय नसतं असं म्हणतात.. असंच काहीसं दिसतंय नाशिकच्या महापालिकेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून ७९ वर्षांच्या आजीबाई निवडून आल्यात.
भिकूबाई बागुल दुसऱ्यांदा महापालिकेची पायरी चढणार आहेत. या आधीही भिकूबाई बागुल महापालिकेच्या नगरसेविका होत्या. १९९२ ते २००२ मध्ये त्यांनी या प्रभागाचं नेतृत्व केलंय. त्यावेळी त्यांचा पक्ष शिवसेना होता.
आता त्यांनी या प्रभागात कमळ फुलवलंय. त्यांच्याविरोधात या विभागातून छाया काकड यांनी निवडणूक लढवली होती.