एकनाथ खडसे यांनी विश्वासघात केला - एमआयडीसी
पुण्याच्या भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी विश्वासघात केल्याचा आरोप एमआयडीसीनं झोटींग समितीसमोर केला.
पुणे : पुण्याच्या भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी विश्वासघात केल्याचा आरोप एमआयडीसीनं झोटींग समितीसमोर केला.
महसूल मंत्री हा राज्यातील जमिनीचा संरक्षक असतो त्यामुळे खडसे यांनी केलेला जमिनीचा व्यवहार हा प्रथमदर्शनी विश्वासघात असल्याने खडसे यांच्यावर विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्याची मागणी एमआयडीसीच्या वकिलांनी केली.
तसंच पोलिसांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांची एक सदस्सीय समिती चौकशी करीत आहे...या प्रकरणात एमआयडीसी तर्फे अंतिम युक्तिवाद करण्यात आला.