चंद्रपूर : समाधान पूर्ती मॉलला लागलेली भीषण आग अनेक तासानंतर आटोक्यात आली आहे. मॉलमध्ये कापडाची दुकानं आहेत. त्या दुकानांपर्यंत पोहोचणं अग्निशमन दलाला कठीण जात होतं. त्यामुळे या आगीवर अजून नियंत्रण मिळवणं शक्य झालेलं नाही. खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या परिसरातल्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर शहराच्या मध्यभागी हा मॉल आहे. या मॉलमध्ये सुपर बाजार आहे. आणि याच बाजारातल्या गोदामात रात्री भीषण आग लागली. ही आग झपाट्यानं संपूर्ण बिल्डिंगमध्ये पसरली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.  सुपर बाजारमधला बहुतेक सगळा माल जळून खाक झालाय. या बिल्डिंगमध्ये स्थानिक वृत्तवाहिनी लाईव्ह चंद्रपूरचं कार्यालय आहे. त्याचबरोबर काही सरकारी कार्यालयं आहेत. या सगळ्यांचंच आगीमध्ये नुकसान झालंय. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या आगीच्या संदर्भात अहवाल मागवून योग्य ती कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


पाहा व्हिडिओ