ठाणे : यंदाच्या पालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आयाराम गयारामांची वर्दळ पाहायला मिळाली. मात्र ठाण्यात एक अजबच प्रकार पाहायला मिळत आहे. 
ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसमधून अशोक राऊळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना उमेदवारीही मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे अशोक राऊळ यांच्या निवडणूक कार्यालयावरुन मतदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. कारण सध्या भाजपमध्ये डेरेदाखल झालेले अशोक राऊळ यांच्या निवडणूक कार्यालयावर भाजपचं पोस्टर आहे, पण कार्यालयाच्या शटरवर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आहे.