निवडणुकीआधीच पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं उघडलं खातं
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने खातं उघडलंय. महापालिका निवडणुकीत भाजपची विजयानेच सुरूवात झालीय.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने खातं उघडलंय. महापालिका निवडणुकीत भाजपची विजयानेच सुरूवात झालीय. भोसरी प्रभाग क्रमांक 6 धावडे वस्तीमधल्या ड जागेवर भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज राहील्याने त्यांची बिनविरोध निवड झालीय.
भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे रवी लांडगे हे पुतणे आहेत. या जागेसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. काँग्रेस मनसेला उमेदवारच मिळाले नाहीत, त्यामुळे भाजप शिवसेना आणि दोन अपक्ष एवढेच फॉर्म राहीले. त्यापैकी शिवसेना आणि अन्य अपक्षाने अर्ज मागे घेतले तर योगेश लांडगे या अपक्षाला समजावण्यात भाजपला यश आलं, त्यामुळे रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज राहील्याने त्यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालीय.