राड्यानंतर भाजप नगरसेवकाला अटक
डोंबिवलीतल्या भाजप शिवसेना राडा प्रकरणी, भाजप नगरसेवक महेश पाटील यांना अटक करण्यात आली.
डोंबिवली : डोंबिवलीतल्या भाजप शिवसेना राडा प्रकरणी, भाजप नगरसेवक महेश पाटील यांना अटक करण्यात आली.
काल रात्री महेश पाटील यांनी शिवसेना शहरप्रमुख भाऊ चौधरी यांच्या तोंडाला काळं फासलं होतं. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात भाऊ चौधरी यांनी काल सकाळी आंदोलन केलं होतं.
त्यामुळे नाराज झालेले भाजप नगरसेवक महेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना शहरप्रमुख भाऊ चौधरी यांच्या घरी जाऊन त्यांना काळं फासलं होतं. त्या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी महेश पाटील यांना अटक केली.
त्यानंतर न्यायालयानं त्यांची दहा हजारांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली.