पुणे : पुण्यातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला तो सिंहगडावर. यावेळी भाजप आरपीआय युतीच्या उमेदवारांनी शपथ घेतली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं आणि शिवरायांच्या राज्यातील सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या बलिदानानं पावन झालेल्या सिंहगडावर या उमेदवारांनी शपथ घेतली. 


पुणे महापालिकेचा कारभार पारदर्शी, सुशासनयुक्त, विकासाभिमुख, गतिमान  आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याचा निर्धार त्यांनी या शपथेतून व्यक्त केला. या सर्व उमेदवारांना शपथ दिली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी.