निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का
ठाण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला धक्का बसलाय. चार महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून पक्षात आलेले जिल्हा उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी बंडखोरी केलीये.
ठाणे : ठाण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला धक्का बसलाय. चार महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून पक्षात आलेले जिल्हा उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी बंडखोरी केलीये.
पक्षाच्या कोअर कमिटीनं तिकीट वाटपात घोळ घातल्याचा आरोप त्यांनी केलाय. घाडीगावकरांसोबत नगरसेविका स्वाती देशमुख आणि समर्थकांनीही भाजपाला सोडचिठ्ठी दिलीये.
विशेष म्हणजे भाजपाचं तिकिट मिळालेल्या 6 समर्थकांनीही पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय़ घेतलाय. आता घाडीगावकर हे चार पॅनलमधून वागळे इस्टेट परिसरातल्या 16 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत.