जळगाव : आपले भाजप सरकार असूनही शिक्षकांचा प्रश्न सोडवता आला नसल्याची खंत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षकांवर शिक्षणाऐवजी इतर कामांचा भार अधिक असून तो काढून घ्यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे, असंही खडसे यांनी स्पष्ट केले आहे. जळगावमध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात खडसे बोलत होते.


शिक्षकांकडून शालेय पोषण आहार वाटप काढून एखाद्या एजन्सीला द्यावी, अशी मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडेंकडे करणार असल्याचे खडसेंनी म्हटले. या कार्यक्रमासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनाही आमंत्रित केलं होतं. मात्र या तिन्ही नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी दबक्या आवाजात कुजबूज होती.