नागपूर  : राज्यातील आज 32 टक्के  मराठा समाज अपेक्षा ठेवून आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकार निर्णय करणार का ? सरकारची इच्छाशक्ती आहे का ? असा सवाल आज कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाच्या प्रस्तावरच्या विधानसभेत चर्चेवेळी ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार नितेश राणे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही निवडून दिलेल सरकार आम्हाला सुरक्षित ठेवू शकत का ? आमदार अशिष शेलार म्हणाले हे मोर्चे सत्तारूढ पक्षाच्या विरोधात नाहीत मग कोल्हापुरात पालकमंत्री निवेदन स्वीकारणे जाहीर केल्यावर 48 तासात का निर्णय बदलावा लागला असा प्रश्न उपस्थित करत राणे यांनी आपल्या घणाघाती भाषणाने मराठा आरक्षणाबद्दल सरकारने विचार करायला हवे असल्याचे ठणकावले.


आमदार अशिष शेलार यांना धरले धारेवर


आशिष शेलार यांचे भाषण ऐकताना राजकारणाचा वास यायला लागला असल्याचे सांगत राजकारणाचा किती तो वास, कधी पर्यंत बोलणार आमची चूक नाही ? शेलार जागा आणि वेळ ठरवावी, राज्य सरकारचे अफिडीव्हीट आणि राणे समिती अहवाल बसून चर्चा करी करू असे आव्हान राणे यांनी अशिष शेलार यांना दिले. 
राणे समितीच्या सगळ्या शिफारशी स्वीकारल्या तर मग राणे समितीवर का बोट ठेवता असा सवाल विचारत आमदार अशिष शेलार यांना आमदार नितेश राणे यांनी धारेवर धरले.


राणे समितीवर टीका का


या राज्य सरकारचा हेतू स्पष्ट आहे का ? याना आरक्षण द्यायचे का ?
असे प्रश्न विचारत आमदार नितेश राणे म्हणाले, बापट समिती कमी पडली म्हणून राणे समिती गठन केली परत आता बापट समितीला हे आणत आहेत का, असा विचार येतोय. मराठ्यांना आरक्षण देण्यात कोणी खोडा घातला ते खत्री आयोगमध्ये इदाते ( दादा इदाते) होते. इदाते कोण आहेत, ते RSS शी संबंधित आहेत.  नुसती चर्चा, चाय पे चर्चा, चर्चे पे चर्चा , ठोस निर्णय घेत नसल्याचे टीका राणे यांनी केली.


सामनाने मराठ्यांना अपमान केला


शिवसेना म्हणते आर्थिक निकषांवर आरक्षण द्या, त्यांचे नेते टीव्हीवर बोलतात ,हे घटनेनुसार शक्य आहे का असे विचारत दिशाभूल करायची, हा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे, अशी टीका करत राणे म्हणाले, मोर्चे निघत असताना सामनामध्ये मुका मोर्चा उल्लेख होतो, याचा समाज विचार करत आहे.सामनाच्या संपादकांची चूक आहे.
आम्हाला वाटले आता राऊत यांचा राजीनामा घेतला जाईल, पण तसे काही झाले नाही. त्यामुळेयांच्या हेतूवर विचार करण्याची गरज असल्याचे राणे यांनी सांगितले.


राज्य सरकारने कोर्टात केस नाजूक करण्यासाठी सरकारने शाहू फी परिपुर्ती योजनेचा निर्णय केलाअसल्याची टीका राणे यांनी केली. या सरकारने पीएसआय परिक्षेत वय वाढवल्याचे जाहीर केले, पण वय मार्यदा अजून वाढवली नाही. त्यामुळे हे सरकार मराठा समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.