पुणे : पुण्यातील भाजपच्या उमेदवारांनी आज मोठा गाजावाजा करत सुराज्याची शपथ घेतली. नरवीर तानाजी मालुसरेंच्या बलिदानानं पावन झालेल्या सिंहगडावर हा कार्यक्रम झाला. मात्र विरोधाभास असा की या कार्यक्रमासाठी आलेल्या एकाही पुढा-यानं आणि कार्यकर्त्यानं गडावर जाण्यासाठीचं प्रवेश शुल्क भरलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे निवडून येण्यापूर्वीच नियमांची पायमल्ली करणारे हे नेते शिवरायांसारखा कारभार कसा बरे करणार अशी शंका उपस्थित होतेय. महापालिकेत निवडून आल्यानंतर छत्रपती शिवरायांसारखा स्वच्छ, पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त, गतीमान कारभार करण्याची प्रतिज्ञा भाजपच्या उमेदवारांनी घेतली. 


मात्र सिंहगडाच्या पायथ्याशी गडाची देखभाल करण्यासाठी चारचाकी वाहनांकडून प्रत्येकी फक्त ५० रुपये शुल्क आकारले जाते. मात्र हे शुल्क न भरताच भाजचे नेते आणि कार्यकर्ते गडावर प्रामाणिक कारभाराची शपथ घेण्यासाठी गेले...