पिंपरी चिंचवडमध्ये तरुणीवर प्राणघातक हल्ला
पिंपरी-चिंचवडमध्ये एका तरुणीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडलीय.
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये एका तरुणीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडलीय.
अश्विनी संजीव रेड्डी बोदकुरवार असं या तरुणीचे नाव असून ती यवतमाळमधील वणीचे भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची मुलगी असल्याचे समजतेय.
जखमी तरुणी बालाजी महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात मुलीनं हाताचं एक बोट गमावलंय.
दरम्यान, याप्रकरणातील आरोपी राजेश बक्षीला पोलिसांनी ताब्यात घेतलय. हा हल्ला एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.