भाजप आमदाराकडून पोलीस शिपायाला मारहाण, गुन्हा दाखल
रायगडच्या कर्जतमधील राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांनी जिल्हाधिका-यांना केलेल्या मारहाणीचं प्रकरण ताजं असतानाच भंडाऱ्यातही भाजपच्या आमदारांचा उद्दामपणा समोर आला आहे.
भंडारा : रायगडच्या कर्जतमधील राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांनी जिल्हाधिका-यांना केलेल्या मारहाणीचं प्रकरण ताजं असतानाच भंडाऱ्यातही भाजपच्या आमदारांचा उद्दामपणा समोर आला आहे.
भंडारा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार रामचंद्र अवसरे यांनी पोलीस शिपायाला मारहाण केली आहे. तुमसर पोलीस स्टेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. भंडारा जिल्यात आझादी 50 दरम्यान रॅलीचे आयोजन करण्यात आलं होते. या रॅलीदरम्यान अवसरे यांच्या खासगी वाहन चालकास पोलीस शिपायानं धक्काबुककी केली. याचा राग येऊन आमदार रामचंद्र अवसरे यांनी पोलीस शिपाई राजू साठव याला मारले.
या प्रकरणी भाजप चे आमदार अवसरे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन तुमसर येथे शाशकीय कामात अडथडा आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रामचंद्र अवसरे हे पेशानं विकिल आहेत. त्यामुळे त्यांच्या अशा वागण्यानं शहरात चर्चा रंगली आहे.