तिरोडा - तिरोडा नगरपालिकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले तरी सत्ता मात्र भाजपच्या हाती गेली आहे. तिरोड्यात नगराध्यक्षपदी भाजपच्या सोनाली देशपांडे यांना विजय मिळाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून आलेत.  तर भाजप-सेना युतीचे सात नगरसेवक विजयी झाले आहेत.


एक ठिकाणी अपक्ष नगरसेवक विजयी झाला आहे. या निकालानं गेल्या 15 वर्षांपासून तिरोड्यात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे.