एसटी एक आठवणी अनेक.... लाल परी @76

एसटी... अनेकांसाठी एसटी हे फक्त प्रवासाचं माध्यम नसून ही आहे एक कमाल भावना. एसटीशी अनेकांच्या अनेक आठवणीसुद्धा जोडल्या गेल्या आहेत. अशी ही एसटी बस सर्वांच्याच मनात खास स्थान मिळवून आहे. 

Jun 01, 2024, 14:12 PM IST

ST Bus : रेल्वेच्या जाळ्यामुळं ज्याप्रमाणे देशाच्या कानाकोपऱ्यात असणारी गावं जोडली गेली आहेत अगदी त्याचप्रमाणं महाराष्ट्रात एसटी महामंडळामुळं अगदी कानाकोपऱ्यात असणारी आणि जगाच्याही संपर्कात नसणारी गावं जोडण्यात आली आहेत. 

1/8

76 वर्षांची लाल परी

maharashtra state transport st bus service turns 76 years old

ST Bus Turns 76 years old : एसटी, लाल परी... रस्त्यानं धावणारी ही लाल परी आता 76 वर्षांची झालीय. विश्वास बसत नाहीये ना? 1 जून हा सर्वांच्याच लाडक्या एसटी बसचा वर्धापन दीन. 

2/8

सामान्यांची एसटी

maharashtra state transport st bus service turns 76 years old

गणेश उत्सव, आषाढी एकादशी , दिवाळी, कार्तिकी या आणि अशा अनेक सणवारांच्या आणि उत्सवाच्या माध्यमातून एसटी बसने गेल्या 76 वर्षांपासून सर्वसामान्य जनतेला सेवा पुरवली आहे. 

3/8

कृतज्ञता

maharashtra state transport st bus service turns 76 years old

अशी ही एसटी आणखी एक वर्ष अनेक प्रवाशांना सेवा देऊ शकली, त्याचनिमित्तानं एसटीचा वर्धापन दिन राज्यारातील प्रत्येक एसटी आगारात साजरा केला जात आहे. या एसटी महामंडळाप्रती आणि या लालपरीप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.   

4/8

आठवणीतली एसटी

maharashtra state transport st bus service turns 76 years old

एसटी बसशी सर्वांच्याच असंख्य आठवणी जोडल्या गेल्या आहेत. गावाला जायचा विषय निघाला, की आधी एसटीचं तिकीट काढण्याची लगबग आजही होते. 

5/8

प्राध्यान्यस्ठानी एसटी

maharashtra state transport st bus service turns 76 years old

प्रवासाची माध्यमं कितीही बदलली असली तरीही ही एसटी आजही अनेकांच्याच प्राधान्यस्थानी आहे. काळ बदलत गेला, तसतशी एसटीची रुपं बदलली. प्रवाशांच्या मागण्या आणि गरजा लक्षात घेता महामंडळानं आवश्यक ते बदल केले.   

6/8

गारेगार प्रवास

maharashtra state transport st bus service turns 76 years old

इतकंच काय, आता तर एसटी चक्क वातानुकुलित अर्थात एसीमध्ये बसून गारेगार प्रवासाची सोयही करून देताना दिसते. कोकणापासून राज्याच्या असंख्य गावखेड्यांना जोडणाऱ्या या एसटीनं कळत नकळत प्रत्येकाच्याच जीवनात एक खास आणि कायमस्वरुपी जागा तयार केली आहे. 

7/8

मागे जाणारा गाव

maharashtra state transport st bus service turns 76 years old

एसटीच्या खिडकीतून मागे जाणारा गाव, निरोप देणारे आजी- आजोबा आजही अनेकांच्याच मनात घर करून आहेत. अशा या असंख्य आठवणी देणाऱ्या एसटीला, वर्धापन दिन्याच्या शुभेच्छा!   

8/8

लालपरी

maharashtra state transport st bus service turns 76 years old

अशा या एसटीशी, लाल परीशी तुमचीही एखादी आठवण जोडली गेलीय का? एसटीच्या खिडकीतून डोकावताना मागे पडणारं दृश्य पाहण्याचा सुखद अनुभव तुम्ही घेतलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा...