सरकारचा हा मंत्री म्हणतो, `भाजप एक नंबरचा शत्रू`
भाजपशी संबंध नकोच अशी भूमिका जिल्हा प्रमुखांनी घेतल्याने भाजप सेनेतील वाद यापुढे आणखी चिघळणार असल्याचे चित्र आहे.
यवतमाळ : शिवसेनेचे संजय राठोड यांचे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पद काढून भाजपचे मदन येरावार यांना पालकमंत्री बनविण्यात आल्याने शिवसेना पदाधिकारी संतप्त झाले असून, भाजप वर आगपाखड करत या कटकारस्थानाचा बदला घेणार आहे.
आता भाजप नंबर एक चा दुष्मन असल्याची गर्जना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली आहे. यापुढे भाजपशी संबंध नकोच अशी भूमिका जिल्हा प्रमुखांनी घेतल्याने भाजप सेनेतील वाद यापुढे आणखी चिघळणार असल्याचे चित्र आहे.