भाजपचा निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव, बाद झालेला अर्ज वैध ठरला...
रेश्मा भोसले यांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेससोडून भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला होता. रेश्मा भोसले यांची उमेदवारी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार वैध ठरवण्यात आलीय.
पुणे : रेश्मा भोसले यांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेससोडून भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला होता. रेश्मा भोसले यांची उमेदवारी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार वैध ठरवण्यात आलीय.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव आणि पुणे महापालिका उपायुक्त यांनी दिलेल्या लेखी स्पष्टीकरणात्मक आदेशानुसार भोसले यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवत असल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
निवडणूक अधिकाऱ्यांवर भाजपचा दबाव आहे असा आरोप काँग्रेसने केला होता. त्याला या निर्णयाने पुष्टीच मिळाली आहे. असाच प्रकार काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांच्याबाबत झाला आहे. मात्र त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळं धंगेकर काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत. पण भोसले यांना वेगळा नियम लावण्यात आल्याचं दिसतंय.