उस्मानाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आले असताना त्यांना शेतकरी प्रश्नावर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी कर्जमाफी आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावरून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. यावेळी युवकच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.


या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी केली.