मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
डोंबिवलीतल्या साहित्य संमेलनाला हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत आले खरे पण इकडे येताना त्यांना सामना करावा लागला काळ्या झेंड्यांचा आणि निदर्शनांचा...
डोंबिवली : डोंबिवलीतल्या साहित्य संमेलनाला हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत आले खरे पण इकडे येताना त्यांना सामना करावा लागला काळ्या झेंड्यांचा आणि निदर्शनांचा...
२७ गावच्या नगरपालिकेचं आश्वासन न पाळल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले.
काटई नाका इथे निदर्शन करण्यात आली. साहित्य संमेलनाआधी २७ गावांबाबत निर्णय घ्यावा अशी संघर्ष समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मागणी केली होती. पण ही मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही.