ट्रेकिंगदरम्यान डोंबिवलीतील तरुणाचा अपघाती मृत्यू
डोंबिवली पश्चिममधील कोपर गाव परिसरात राहणारा हर्षद भोळे या 17 वर्षीय मुलाचा ट्रेकिंग करताना अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
डोंबिवली : डोंबिवली पश्चिममधील कोपर गाव परिसरात राहणारा हर्षद भोळे या 17 वर्षीय मुलाचा ट्रेकिंग करताना अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
हर्षद आपला भाऊ आणि मित्रांसह भिवपुरी ते माथेरान दरम्यान पेब किल्ल्यावर ट्रेकिंग साठी गेला होता. ट्रेकिंग करत असताना जोरदार पावसमुळे एक दगड त्याच्या डोक्यात पडला.
जखमी हर्षदला नेरळच्या रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हर्षद हा 12 वीला वझे केळकर महाबिद्यालयात शिकत होता. त्याच्या मृत्यूनं कोपर गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.