नागपूर : पबमध्ये दारुच्या बिलावरून झालेल्या वादात एक युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभम महाकाळकर असे हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. या प्रकरणी बार मालकावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बार मालकानं माजी नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचे पुत्र रोहित आणि अभिजीत यांच्यावर तोडफोड आणि खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या याप्रकाराचा अधिक तपास सुरू आहे.