मुंबई : शिवसेनेमध्ये स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी युती तोडावी असं थेट आव्हान विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. भाजपकडून शिवसेनेचा नेहमी अपमान होतो, पण शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्याचा आरोपही विखे-पाटील यांनी केला आहे.


आगामी महापालिका निवडणुकींमध्ये शिवसेनेनं स्वबळावर जायची तयारी दाखवली आहे. त्यावरून विखे-पाटील यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.